अमेरिकेतून आलेल्या प्रवाशाला कोरोना, राज्यात रुग्णांची संख्या वाढली

अमेरिकेतून आलेल्या प्रवाशाला कोरोना 

Updated: Mar 13, 2020, 08:28 PM IST
अमेरिकेतून आलेल्या प्रवाशाला कोरोना, राज्यात रुग्णांची संख्या वाढली  title=

पुणे : अमेरिकेतून आलेल्या प्रवाशाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. पुण्यात आज एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० वर गेली असून राज्यात कोरोना बाधितांची संख्या आता १७ वर गेली आहे. आज नागपुरात २ आणि पुण्यात १ कोरोना रुग्ण आढळला. 

राज्यात आज कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. सर्व रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याची माहिती पुण्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. काही रुग्ण परस्पर माध्यमांशी संपर्क करत आहेत. माध्यमांनी देखील अफवांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. 

सोशल मीडियावर खोटी बातमी देणाऱ्या वर कारवाई करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. एका न्यूज ची स्क्रीन फोटोशॉप करून साताऱ्यात रुग्ण सापडल्याची बातमी प्रसारित करणाऱ्या एकाचा सुगावा लागलाय. पोलीस त्याच्यावर कठोर कारवाई करतील. सध्या त्याचा फोन स्वीच ऑफ येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

सध्या 311 संशयित रुग्ण निरीक्षणाखाली असून 24 जण हॉस्पिटलमध्ये आहेत. अजून काही सॅम्पलचे रिपार्ट यायचे आहेत. या ठिकाणी अजून पर्यंत एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार करणाऱ्या तीन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.