फोटो : खंबाटकी घाटात केमिकल घेऊन जाणार टँकर उलटून अपघात

महामार्ग ४८ वरची वाहतूक विस्कळीत होऊन अतिशय धीम्या गतीनं पुढे सरकतेय.

Updated: Feb 7, 2019, 12:35 PM IST
फोटो : खंबाटकी घाटात केमिकल घेऊन जाणार टँकर उलटून अपघात title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : सातारा - पुणे - बंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील खंबाटकी घाटात केमिकलनं भरलेल्या एका टँकरला अपघात झाला आहे. हा टँकर साताऱ्याकडून पुण्याचा दिशेला निघाला होता. केमिकल टँकर चालकाचं खंबाटकी घाटातील एका वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हा टँकर महामार्गाच्या कडेला असलेल्या लोखंडी बारला धडकून पलटी झाला.


खंबाटकी घाटात टँकर उलटला

रस्त्यावरच टँकर उलटल्यानं या टँकरमध्ये असलेले नायट्रिक ऍसिड हे केमिकल बाहेर फेकले जाऊ लागले. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या धुराचे लोट बाहेर दिसू लागले.

घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे बंब आणि पोलीस घटनास्थळी पोहचले पण काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता वाहतूक धिम्या गतीने सुरू झाली आहे.