कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : शहराच्या विकासाशी प्रशासकीय अधिका-यांना काही घेणंदेणं आहे की नाही असा प्रश्न पडावा असं पिंपरी चिंचवडमध्ये घडलंय.
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे अतिशय महत्त्वाच्या मिटींगमध्ये मोबाईलवर गुंग असल्याचं दिसून आलंय.
पिंपरी चिंचवड महापालिकेत मेट्रोबाबत सादरीकरण सुरू होतं. मात्र आयुक्तांना त्यात काहीही रस नव्हता. सादरीकरण सुरू असताना ते व्हॉट्सअप चेक करण्यात गुंतले असल्याचं दिसून आलंय. तर स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे यासुद्धा फेसबुक पाहण्यात दंग होत्या.
एक जण तर मोबाईलवर चक्क बाहुबली पाहण्यात दंग होता. एकूणच काय तर शहरातून धावणाऱ्या मेट्रोसाठी अधिकारी आणि नगरसेवक किती गंभीर आहेत हे तुम्हीच ठरवा.