साईंचा शताब्दी सोहळा, पंतप्रधान मोदी आज शिर्डीत

मोदीच्या हस्ते ध्वजावतरण करुन समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप

Updated: Oct 19, 2018, 08:53 AM IST
साईंचा शताब्दी सोहळा, पंतप्रधान मोदी आज शिर्डीत  title=

शिर्डी : शिर्डीत साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्याला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते ध्वजावतरण करुन समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप करण्यात येणार आहे. या निमित्ताने मोंदीच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. दर्शन रांग, अद्यावत आणि आधुनिक शैक्षणिक संकुल, साई नॉलेज पार्क, १० मेगावॅट विद्युत प्रकल्प, अशा पाचशे कोटी हून अधिक निधीच्या प्रकल्पाचे आज सांकेतिक उदघाटन होणार आहे. यावेऴी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेतील पाच लाभार्थींना घराच्या चाव्याही सुपुर्द करणार आहेत.

तृप्ती देसाईला अटक

दरम्यान, तृप्ती देसाई यांना पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतलंय. सबरीमाला मंदिरात महिला पत्रकारांना झालेल्या मारहाणी बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी त्या शिर्डीला जाणार होत्या मात्र शिर्डीला जाण्याच्या तयारीत असतानाच आज पहाटे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सरकार नगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलंय.