केंद्र चालकानंच पुरवल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉप्या (व्हिडीओ)

 केंद्र चालकानंच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या 

Updated: Feb 19, 2020, 03:41 PM IST

औरंगाबाद : बारावीचा मंगळवारी इंग्रजीचा पेपर झाला. त्यात एका केंद्र चालकानंच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केलीय. औरंगाबादच्या वाळूज परिसरातील गजानन महाविद्यालय इथं हा प्रकार घडलाय. 

शाळेतील प्रयोग शाळेच्या रूम मध्ये ६ शिक्षक प्रश्नांची उत्तरं लिहित असल्याचं कॉन्स्टेबलच्या लक्षात आलं. त्यानं तात्काळ ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. 

त्यातून पोलिसांनी छाप घातला आणि हा सगळा प्रकार उघड झाला. हे 6 शिक्षक सामूहिक कॉपी तर पुरवत होतेच सोबतच गैरहजर विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवत होते. 

पोलिसांनी गुन्हा दाखल करत ६ शिक्षकांना अटक केली आहे.