close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकायला गेलेल्या पोलिसांना मारहाण

दांडेगावातील हॉटेलमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली होती.

Updated: Jul 12, 2018, 04:26 PM IST
जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकायला गेलेल्या पोलिसांना मारहाण

हिंगोली: जिल्हयातील कळमनुरी तालुक्यात जुगाऱ्यांनी पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. दांडेगावातील हॉटेलमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंकुश शेळके आणि गुरु पवार हे दोन पोलीस छापा टाकण्यासाठी हॉटेलवर गेले असता त्यांना काही जुगाऱ्यांनी मारहाण केली.  घटनेनंतर पोलिसांच्या फिर्यादीवरून 13 आरोपींविरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल चालक चांदू बाळवतेंला पोलिसांनी अटक केली असून इतर फरार आहेत. हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे फोफावल्यानेच पोलिसांना मार खाण्याची वेळ आलेली आहे. या घटनेमुळे सर्वत्र पोलिसांची दलाची चांगलीच नाचक्की झाली आहे.