पोलीस बदल्यांवर टीका करणाऱ्या भाजपला सामनातून कानपिचक्या

 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार कानपिचक्या 

Updated: Sep 4, 2020, 09:53 AM IST
पोलीस बदल्यांवर टीका करणाऱ्या भाजपला सामनातून कानपिचक्या title=

मुंबई : हिशेबाची वही ठेवण्याची सवय आधीच सरकारलाच असावी असा जबरदस्त टोला सामनातून चंद्रकांत पाटील यांना लगावण्यात आलाय. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार कानपिचक्या दिल्या आहेत. 

विरोधकांनी सत्तेत असताना मर्जीतले अधिकारी नेमले. पण आता सरकारचा व्यवहार जनतेच्या सुरक्षेसाठी असून चोख कारभार झाल्याचे सामनातून म्हटलंय. बदल्यांमागचा हिशोब जाहीर करतो असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला होता. या आरोपाला सामनातून उत्तर देण्यात आलंय. 

आता कर्तबगारी आणि राज्याची गरज पाहून नेमणूका झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मिळून हा निर्णय घेतलाय. पोलीस बदल्यांमध्ये पारदर्शकता असल्याचेही स्पष्ट करण्यात आलंय. 

विश्वास नांगरे यांची कायदा व सुव्यवस्थेच्या सह आयुक्तपदी, तर मिलिंद भारांबे यांची गुन्हे शाखेच्या सह आयुक्तपदी बदली करण्यात आली. विरोधी पक्षाने या बदल्यांवर जोरदार टीका केली आहे. तर सरकारमधील मंत्र्यांनी या टीकेला प्रत्युत्तरही दिले आहे. ४० हून जास्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, त्यांना नियुक्त्या न देता प्रतिक्षेत ठेवण्यात आलंय. यात देवेन भारती, एम. एम. रानडे, निशित मिश्रा, सुनील फुलारी, संजय कुमार बावीस्कर, मनोज कुमार शर्मा, महादेव तांबाडे, संदीप बिष्णोई यातील काही अधिकार्‍यांची भाजपशी जवळीक असल्याची चर्चा आहे.

नवं सरकार आलं की प्रशासनातील आणि पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जातातच. अधिकार्‍यांच्या बदल्या करून प्रशासन आणि पोलीस दलावर आपली पकड मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. या माध्यमातून सरकार आपल्या मर्जीनुसार चालवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असतो.