एका मांजराकडून 60 हजार ग्राहकांची बत्ती गुल, असं नक्की काय झालं?

Power outage in Pimpri-Chinchwad area : अनेकदा वीज बिल न भरल्यामुळे विद्युत जोडणी तोडण्यात येते. मात्र, एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांची बत्ती गुल झाली आहे. 

Updated: Mar 23, 2022, 09:24 PM IST
एका मांजराकडून 60 हजार ग्राहकांची बत्ती गुल, असं नक्की काय झालं? title=

कैलास पुरी / पिंपरी-चिंचवड : Power outage in Pimpri-Chinchwad area : अनेकदा वीज बिल न भरल्यामुळे विद्युत जोडणी तोडण्यात येते. मात्र, एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांची बत्ती गुल झाली आहे. या मांजरामुळे 60 हजार लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली. भोसरी, आकुर्डीमधील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाल्याने अंधारात राहावे लागले. 

महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आज बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे भोसरी आणि आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला. पणा हा सगळा प्रकार एका मांजरामुळे घडला. एक मांजर ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आले 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला.

आधीच उकाड्याने हैराण झालेले नागरिक विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने जाम वैतागलेत. उकाड्याच्या काळात लोक अंधारत बसले होते. काही जण रस्त्यावर फेटफटा मारत महावितरणाच्या नावाने शिमगा केला.

भोसरीमधील गवळी माथा येथे महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रामध्ये 100 एमव्हीए क्षमतेचे दोन , 75 एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र त्यातील 100 एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण 26 वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र यातील 100 एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण 10 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. 

परिणामी प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. महावितरणकडून याबाबत संबंधित सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती दिली.