Sanjay Raut : शरद पवार भाजपचे...संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा

 Political News : ठाकरे गट- वंचित युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांनी आज इशारा दिला आहे.  

Updated: Jan 27, 2023, 11:45 AM IST
Sanjay Raut : शरद पवार भाजपचे...संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा
Sanjay Raut warns Prakash Ambedkar

Maharashtra Political News : ठाकरे गट- वंचित युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. वंचितला मुंबईबाहेर कोट्यातल्या जागा देण्यास राष्ट्रवादीने नकार दिला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेल्या एका विधानावरुन आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचवेळी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांनी आज इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी विधानं करताना आंबेडकरांनी जपून बोलावे, असे म्हटलंय. (Sanjay Raut warns Prakash Ambedkar)

'पवार भाजपचे आहेत हा आरोप करणं गंभीर'

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांविषयी अशी विधानं करणं आम्हाला मान्य नाही. पवार भाजपचे आहेत हा आरोप करणं गंभीर आहे, असं राऊत यांनी म्हटले आहे.  पवारांविषयी विधानं करताना आंबेडकरांनी जपून बोलावं असा इशारा त्यांनी दिला. मुंबईबाहेर राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या कोट्यातल्या जागा देणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाशी यांची सध्या युती झाली आहे. त्यामुळे मुंबईबाहेर आमच्या कोट्यातल्या जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं राष्ट्रवादी कळवल्याची सूत्रांची माहिती आहे.

वंचित महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता धूसर 

प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते, पवार  लेफ्टला पाहतात आणि राईटला हात देतात. वंचितची युती शिवसेनेशी आहे. महविकास आघाडीत  जाण्याची इच्छा नाही, असे प्रकास आंबेडकर म्हणालेत. त्यामुळे आंबेडकर यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.  महविकास आघाडी जाण्याची इच्छाही नाही असं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे वंचित महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता धूसर झाली आहे. 

आम्ही वंचित असू तर आमची दखल नका घेऊ. महाविकास आघाडीचा भाग होण्याची माझी इच्छा नाही, अस मी म्हणाणार नाही. पणं आमची युती शिवसेनेशी आहे. जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. शिवसेना आणि वंचित एकत्र लढली आणि बाकी एकत्र नाही आले तरी आम्ही सरकार बनवू असे आंबेडकर म्हणाले.