पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

 Modi inaugurates Pune Metro : पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी यांनी मेट्रोला हिरवी झेंडा दाखवला. त्या 

Updated: Mar 6, 2022, 12:22 PM IST
पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन title=

पुणे :  Modi inaugurates Pune Metro : पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी यांनी मेट्रोला हिरवी झेंडा दाखवला. त्यानंतर मोदी यांनी तिकीट काढेल आणि  मेट्रोमध्ये बसले. यावेळी त्यांच्यासोबत अंध विद्यार्थी सोबत होते. मेट्रो प्रवास सुरु झाला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या मुलांसोबत संवाद साधला.(Prime Minister Modi inaugurates Pune Metro; Metro open to the public from today)

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्याआधी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोदी यांचा सत्कार केला. तसेच शाही फेटा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सुबक मूर्ती देऊन सत्कार केला.

गरवारे मेट्रो स्थानकाजवळ गाडीतून उतरून आजूबाजूच्या सर्वांना हात दाखवत, नमस्कार करत पंतप्रधानांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रवेश केला. यावेळी गरवारे मेट्रो स्थानकात मोदी यांची स्वागत करण्यात आले. मेट्रोचे अधिकारी, महापौर आणि अन्य राजकीय मंडळींनी पंतप्रधानांचे यावेळी स्वागत केले. त्यानंतर गरवारे मेट्रो स्थानकाची पाहणी करत पंतप्रधानांनी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास केला. गरवारे कॉलेज ते आनंद नगर स्टेशन दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी प्रवास केला.  मेट्रो आनंदनगर स्टेशनवर पोहोचली आणि मोदी यांनी मेट्रोतील प्रवास संपवून MIT कॉलेज ग्राउंड वर सभेसाठी रवाना झालेत.