काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंना माजी मुख्यमंत्र्यांचा सल्ला

काँग्रेसवर टीका करणाऱ्या नारायण राणेंनी स्वत:चं आत्मपरिक्षण करावं, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणेंना लगावलाय. ते अकोला इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

Updated: Sep 24, 2017, 02:57 PM IST
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंना माजी मुख्यमंत्र्यांचा सल्ला  title=

अकोला : काँग्रेसवर टीका करणाऱ्या नारायण राणेंनी स्वत:चं आत्मपरिक्षण करावं, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणेंना लगावलाय. ते अकोला इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही जोरदार टीका केली. प्रकाश मेहता, सुभाष देसाई, राधेश्याम मोपलवारांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करतानाच खडसेंना वेगळा न्याय का? असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. 

याखेरीज बुलेट ट्रेन हा मूर्खपणाचा निर्णय असून तेवढ्या पैशांत कर्जमाफी करता आली असती, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अमेरिकन बहूराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाखाली मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा आरोपही चव्हाणांनी केलाय.