मी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर... अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत. अजित पवारांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली. अजित पवार यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 29, 2024, 09:47 PM IST
मी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर... अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज  title=

Ajit Pawar vs Anjali Damania:  पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांचा फोनही चेक करा, अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे. मी नार्को टेस्टला तयार आहे असे म्हणत अंजली दमानिया यांचे आव्हान अजित पवार यांनी स्वीकारले आहे. मात्र, हे आव्हान स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना एक  ओपन चॅलेंज देखील दिले आहे. 

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेलं आव्हान अजित पवारांनी स्वीकारलं. एवढंच नाही तर अजित पवारांनी अंजली दमानियांना प्रतिआव्हानही दिले.  माझी नार्को टेस्टला तयारी आहे मात्र त्यातून मी क्लिअर निघालो तर अंजली दमानियांची पुन्हा माध्यमांसमोर यायचं नाही. अंजली दमानियांनी संन्यास घ्यायचा असं प्रतिआव्हान अजित पवारांनी दिले.

अजित पवार यांचे चॅलेंज अंजली दमानिया यांनी स्वीकारले

अजित पवार यांचे चॅलेंज अंजली दमानिया यांनी स्वीकारले आहे. अजित पवारांनी नार्को टेस्ट करायला तयार आहेत असे आत्ताच माध्यमांमधून कळले. पण जर सिद्ध झालं की त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फ़ोन केला नाही, तर जसे अजित पवार म्हणाले,की “मी गप्प घरी बसव आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा” हे मला पूर्णपणे मान्य. कधी करणार नर्को टेस्ट ते लवकरात लवकर कळवा... असं अंजली दमानिया म्हणाल्या. 

पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? असा आरोप अंजली दमानियांनी केलाय. त्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब खुलासा करावा अशी मागणी अंजली दमानियांनी केलीये..अजित पवारांनी फोन केला असेल तर तातडीने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी अंजली दमानियांनी केलीये. त्यावर आपण कोणालाही फोन केला नसल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे.त्याचबरोबर कोणत्याही दबावाला बळी पडू नका अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचं अजित पवार म्हणाले होते.यानंतर आात अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना चॅलेंज दिले आहे. 

झी २४ तासवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आमनेसामने आले.. दमानिया सुपारी घेऊन अजित पवारांवर आरोप करतात, असा आरोप चव्हाणांनी केला. तर चव्हाणांचं डोकं ठिकाणावर आहे का, असा सवाल दमानियांनी केला. पुण्यात येते, मला थांबवून दाखवा... असं चॅलेंजही त्यांनी दिलं. यावेळी चव्हाणांनी केलेल्या टीकेमुळं दमानिया संतापल्या... आणि झी २४ तासवरील लाईव्ह चर्चेतून उठून निघून गेल्या.

अजय तावरेला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचं संरक्षण असून, तावरे, सापळे आणि चंदनवालेंचा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचा संबंध काय?... अजय तावरे हा ब्ल़ सॅम्पल बदलण्या इतका मर्यादित नाहीये...तर त्याने गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं...मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं...असा खळबळजनक दावा सुषमा अंधारेंनी केलाय...