भाजपा आमदारांचे सॅंडविच खाऊन उपोषण

एकीकडे काँग्रेसच्या छोले भटूरे आंदोलनानंतर प्रचंड काळजी घेण्यात आलेल्या भाजपच्या आंदोलनानंतर सँडविचचा व्हिडीओ समोर आलाय.

Updated: Apr 12, 2018, 05:29 PM IST

पुणे : एकीकडे काँग्रेसच्या छोले भटूरे आंदोलनानंतर प्रचंड काळजी घेण्यात आलेल्या भाजपच्या आंदोलनानंतर सँडविचचा व्हिडीओ समोर आलाय. भाजपचे दोन आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांचा उपवास सुटला. हे दोघे बालगंधर्व रंगमंदिरासमोर सुरू असलेल्या उपोषणामध्ये काही वेळ सहभागी झाले. त्यानंतर हे दोघे डीपीडीसीच्या मीटिंगसाठी काउन्सिल हॉलला पोहचले. तिथे पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम आणि जलयुक्त शिवार योजनेची बैठक होती. बैठक सुरू झाली आणि प्रथेप्रमाणे समोर प्लेट्स आल्या. सँडवीच, वेफर्स आणि बर्फी असे खाद्यपदार्थ समोर आले. दोन्ही आमदार महोदयांनी त्याचा आस्वाद घेतला आणि उपोषण सुटलं.