Pune Kasba Chinchwad Election : राज्यात शिंदे - फडवणीस सरकार स्थापन झाल्यानंतर दुसरी पोटनिवडणूक होत आहे. (Maharashtra Political News) मात्र, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. आता कसबा पेठ (Pune Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad ) विधानसभा मतदारसंघात आम्हीच बाजी मारु असता दावा करण्यात आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. ( Pune Bypoll Election ) भाजप आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक जिंकण्यासाठी शक्तिपणाला लावली आहे. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने विरूद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचं भवितव्य पणाला लागले आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांची तिरंगी लढत रंगली आहे. आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. (Political News) उद्या गुरुवारी 2 मार्चला निकाल लागणार आहे. (Pune Kasba Chinchwad Election Bypoll Result)
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात काहीही करुन जागा राखण्यासाठी भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर विधानपरिषद निवडणुकीपाठोपाठ भाजपला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीनेही ही निवडणूक सर्वशक्तिनिशी लढली. तुलनेत मोठ्या असलेल्या चिंचवड मतदारसंघात पन्नास टक्के मतदान झाले आहे. इथे मतमोजणीच्या 37 फेऱ्या होतील, त्यामुळे अधिकृत अंतिम निकाल हाती येण्यास रात्रीचे 10 वाजण्याची शक्यता आहे. तर कसबा हा तुलनेने लहान मतदारसंघ आहे. त्यामुळे इथे निकाल लवकर लागेल. पुण्यात कोरेगाव पार्क भागातील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. यामुळे वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत चित्र वेगळं असेल. या ठिकाणी महाविकास आघाडीने विजयाचा दावा केला आहे. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. पुणे कसबा आणि चिंचवड येथील दोन्ही जागा या भाजपच्या असल्याने त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवर चिंचवड मतदारसंघाच्या आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे बॅनर झळकले आहेत. नुकतीच चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली. मतदारांनी तिरंगी लढतीत कोणत्या उमेदवाराला कौल दिला आहे हे उद्या समजणार आहे. मात्र त्याअगोदरच मध्यरात्री एक्स्प्रेस वेवरच्या उर्से टोलनाका इथं अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाली म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान, त्याआधी पुन्हातही भाजप आणि महाविकास आघाडीच्या भावी आमदारांचे फलक समर्थकांतून लावण्यात आले होते. त्यामुळे भावी आमदार कोण हे उद्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे.
पुण्यातील कसबा पेठमध्ये यावेळी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आलाय. ते 70 हजारांपेक्षा जास्त मते घेऊन विजयी होऊ शकतात. तर त्यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 60 हजार दरम्यान मते पडू शकतात.
पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या चिंचवड मतदारसंघात भाजपला ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळेल असा अंदाज आहे. याठिकाणी भाजपला सहानभुती मिळण्याची शक्यता आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी यांना एक लाखांपेक्षा जास्त मते मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना जवळपास लाखाच्या आत मते पडतील. मात्र, अपक्ष राहुल कलाटे हे जवळपास 60 हजार मते घेऊ शकतात. त्यामुळे येथे महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता जास्त आहे.