ऊंदीर, घूस आणि खेकड्यांमुळे कालवा फुटला - गिरीश महाजन

ऊंदीर, घूस आणि खेकड्यांमुळे कालवा फुटला. जलसंपदा मंत्र्यांचे धक्कादायक विधान 

Updated: Sep 28, 2018, 11:54 PM IST
ऊंदीर, घूस आणि खेकड्यांमुळे कालवा फुटला -  गिरीश महाजन title=

पुणे :  कालवा फुटून लोकांच्या घरात पाणी घुसले. पुण्यात पानशेत धरण फुटल्याची पुनःप्रचिती पहायला मिळाली. घटनेची दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झाले आणि हा कालवा ऊंदीर, घूस आणि खेकड्यांमुळे फुटल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारी पुणे शहरातून वाहनारा खडकवासला धरणाचा मोठा उजवा कालवा फुटला. त्यामुळे पर्वती लगतच्या जनता वसाहतीत पाणी घुसले आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची पाहणी करण्यासाठी जलसंपदामंत्री घटनास्थळी दाखल झाले. हा कालवा ऊंदीर, घूस आणि खेकड्यांमुळे फुटल्याची माहिती त्यांनी दिली. 

कारणे काय पाहा?

एक - कालव्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलं होतं. 
दोन- कालवा परिसरात राहण्याऱ्या लोकांनी दगड - मातीसाठी कालव्याची भिंत उकरलीय 
तीन - भूमिगत केबल टाकण्यासाठी कालव्याला लागून खोदकाम झालं 
चार - कालव्याच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं करण्यात आली
पाच - उंदीर, घुशींनी कालव्याची भिंत पोखरली 
या किंवा यातल्या काही कारणांमुळे कालवा फुटल्याचं स्प्ष्ट झालंय. मात्र प्रश्न असा  की ही सगळी कारणं अचानक उद्भवलेली आहेत का ? तर तसं अजिबातच नाही. 

पुण्यात फुटलेल्या कालव्याचं पाणी ओसरलंय, मात्र त्यावरून आरोप प्रत्यारोपांचा महापूर आलाय. सगळेच एकमेकांवर जबाबदारी झटकतायत. राजकीय पुढारी पुराच्या पाण्यात स्वतःच्या घागरी भरून घेतायत. या सगळ्यात हा कालवा नेमका कशामुळे फुटला आणि यापुढच्या काळात या घटनेची पुनरावृत्ती व्हायला नको याचा विचार होण्याची आवश्यकता आहे.