वाहनचालकाची मुजोरी, ट्रॅफिक पोलिसाला 800 मीटर दूर फरफटत नेलं, पाहा व्हीडीओ

मुजोर वाहनचालकावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

Updated: Oct 17, 2021, 03:50 PM IST
वाहनचालकाची मुजोरी, ट्रॅफिक पोलिसाला 800 मीटर दूर फरफटत नेलं, पाहा व्हीडीओ

निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे : पुण्यात (Pune) धक्कादायक घटना घडली आहे. एका माजोरड्या वाहनचालकाने वाहतूक पोलिसाला (Traffic Police) फरफटत नेलंय. हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सर्व प्रकारानंतर या मुजोर वाहनचालकावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune car driver Dragged traffic police for 800 meters away)

पुण्यातल्या मुंढवा भागात हा धक्कादायक प्रकार घडला. प्रशांत श्रीधर कांतावर असं या वाहनचालकाचं नाव आहे. त्यानं पोलीस हवालदार शेषराव जायभाय यांच्या अंगावर गाडी घातली. तसंच त्यांना जवळजवळ 700 ते 800 मीटर फरफटत नेलं. या दृश्यांच्या माध्यमातून हा प्रकार किती गंभीर आहे, हे समजू शकतं. 

वाहतूक पोलिस किंवा पोलिस कर्मचाऱ्यांसोबत असे प्रकार घडण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी काही वर्षांपूर्वी मुंबईत वाहतूक पोलिस विलास शिंदे यांना ऑन ड्युटी मारहाण करण्यात आली होती. यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचे रक्षकच सुरक्षित नसतील, तर सर्वसामांन्यांचं काय, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे.