भाजपा आमदारावर खंडणी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल

टिळेकर हे हडपसरचे भाजपा आमदार तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. 

Updated: Oct 12, 2018, 06:59 PM IST
भाजपा आमदारावर खंडणी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल

नितिन पाटणकर, झी मीडिया, हडपसर : भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऑप्टीकल फायबर केबल टाकणाऱ्या कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. टिळेकर यांच्यासह त्यांचा भाऊ चेतन आणि गणेश कामठे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. टिळेकर भाजपचे हडपसर मतदार संघातील आमदार आहेत.

गुन्हा दाखल 

सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कार्यकरत्या गणेश कामटे आणि दोन्ही भावांनी 50 लाखांची खंडणी मागितल्याचं म्हटलंय.

एक महिन्यापूर्वी यासंदर्भात फोनवर संभाषण झाल होतं. फिर्यादींनी ही ऑडिओ क्लिपही पोलिसांना दिली आहे.  

आमदार योगेश टिळेकर यांनी बिल्डरकडून मर्सिडीज बेंझ घेतल्याचा आरोप मनसेनं केला होता.

टिळेकर हे हडपसरचे भाजपा आमदार तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत.