मैत्रिणीसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणाची हत्या, डोक्यात बिअरची बाटली फोडली

कायदा सुव्यवस्था धाब्यावर, भरदिवसा तरुणाच्या हत्येने पुणे हादरलं

Updated: Sep 25, 2022, 05:27 PM IST
मैत्रिणीसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणाची हत्या, डोक्यात बिअरची बाटली फोडली title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. याला कारणही तसंच आहे. पुण्यात भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या अल्पवयीन मुलाचा डोक्यात बिअरची बाटली आणि झाडाची कुंडी घालून खून करण्यात आलाय. नागेश सिद्धाप्पा चिंचोळे असं 17 वर्षांच्या मयत मुलाचं नाव आहे. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक इथं ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

नागेश हा वडगाव बुद्रुक इथल्या पाऊंजाई मंदिर पाठीमागील घुले नगर परिसरात असणाऱ्या मोकळ्या प्लॉटमध्ये आपल्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत बसला होता. दरम्यान त्या ठिकाणी एका तरुणाने येऊन नागेश याच्या डोक्यात बिअरची बाटली आणि झाडाची कुंडी घातली. अचानक झालेल्या हल्ल्यात नागेशचा जागीत मृत्यू झाला. प्रेमप्रकरणातून हा खून घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.