पुण्यातल्या त्या युवतीचा संशयास्पद मृत्यू...गळा दाबल्याच्या खुणा

पुण्यामध्ये एका तरुणीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. सिंहगड रोडवरील माणिक बाग परिसरातील ही घटना आहे

Updated: Dec 3, 2019, 01:21 PM IST
पुण्यातल्या त्या युवतीचा संशयास्पद मृत्यू...गळा दाबल्याच्या खुणा

पुणे : पुण्यामध्ये एका तरुणीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. सिंहगड रोडवरील माणिक बाग परिसरातील ही घटना आहे. ही तरुणी एमबीए ग्रॅज्युएट होती. पुण्यामध्ये ती ती कुटुंबीयांसोबत राहत होती. गेल्या आठवड्यात ते सगळे मूळ गावी बीडला गेले होते. तरुणीचा इंटरव्यू असल्याने ती एकटीच पुण्यात परतली होती. 

मात्र त्यानंतर रविवारी दिवसभरात तिचा फोन लागला नाही म्हणून तिची आई थेट पुण्यात आली. त्यावेळी घर बंद होतं. त्यामुळे पोलिसांना बोलावून घर उघडण्यात आलं. त्यावेळी घरात तरुणीचा मृतदेह आढळून आला. 

धक्कादायक म्हणजे घरात काही दारूच्या बाटल्या देखील सापडल्या त्याचप्रमाणे मुलीच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा आढळून आल्याचं कुटुंबियांचे म्हणणं आहे. त्यामुळे मुली सोबत गैरप्रकार तसेच घातपात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.