'हा' पूल वाहतुकीसाठी महिनाभर बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune News : पुणे शहरातील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेला पूल दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल पूना रुग्णालयाजवळील असून वाहनचालकांनी पर्यायी मार्ग जाणून घ्या... 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 4, 2024, 10:34 AM IST
'हा' पूल वाहतुकीसाठी महिनाभर बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग  title=

pune deccan yashwantrao chavan bridge closed : पुणे शहरातील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेला पूल दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद ठेवण्यात येणार आहे. पूना रुग्णालयाजवळील पूल असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे. बंद पुलामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आले आहे. 

पूना हॉस्पिटलजवळील यशवंतराव चव्हाण पुलाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण फेब्रुवारी महिनाभर हे काम सुरू राहणार आहे.  29 फेब्रुवारीपर्यंत पुलाचे बेअरिंग आणि एक्स्पेन्शन जॉइंट बदलले जाणार आहेच. त्यामुळे पूल वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.

हे पर्यायी मार्ग आहेत

नवी पेठेहून पूना हॉस्पिटलकडे डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी गांजवे चौकातून टिळक चौक, छत्रपती संभाजी पूल (लाकडी पूल), खंडोजीबाबा चौक या मार्गाचा वापर करावा. कर्वे रोडने नवी पेठेकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खंडोजीबाबा चौक, छत्रपती संभाजी पूल, खंडोजीबाबा चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. 

 ...म्हणून पुलाची समपातळी बिघडली

नवी पेठ आणि डेक्कन जिमखाना यांना जोडणारा यशवंतराव चव्हाण पूल 1990 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. एकूण 13 खांब आहेत. त्यात 65 मिमी व्यासाचे (2.5 इंच) एकूण 96 बेअरिंग बसवले आहेत. यावरुन फक्त दुचाकी आणि तीनचाकी वाहने जातात. गेल्या 33 वर्षांत वाहतुकीमुळे 65 एमएमच्या बेअरिंची जाडी कमी होऊन 15 एमएम इतकी झाली आहे.  त्यामुळे पूल सुरक्षित नसल्याने बेअरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी 16 इंच लांबीच्या गर्डरवर हायड्रोलिक जॅक बसवून नवीन बेअरिंग बसवण्यात आले आहेत. एका दिवसात तीन ते चार बेअरिंग बदलल्याने पुलाची पातळी खालावली आहे. दोन गर्डरमधील अंतर वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकांचा अपघात किंवा रस्त्यावर अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. 

दरम्यान शहरातील मुळा-मुठा नदीवर अनेक पूल आहेत.   या पुलांचे महापालिकेने सेफ्टी ऑडिट केले आहे. त्यात नवी पेठेतील पूना हॉस्पिटलजवळील यशवंतराव चव्हाण पुलामध्ये महत्त्वाच्या सुधारणा सुचविण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ठेकेदारांच्या माध्यमातून काम सुरू केले आहे.