उद्योजकाची दगडाने ठेचुन हत्या

उद्योजकाची दगडाने ठेचुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली

Updated: Feb 18, 2020, 10:29 AM IST

हेमंत चापुडे, झी मिडिया, पुणे : चाकण औद्योगिक नगरितील बिरदवडी येथे एका उद्योजकाची दगडाने ठेचुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला असून हत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. हरिश्चंद्र किसनराव देठे असे हत्या झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.

व्ही.एच.डी. इंजिनिअरिंग नावाचे वर्कशॉप हरीश्चंद्र देठे चालवत होते. रोजच्या दैनंदिन वेळेप्रमाणे देठे वर्कशॉपमध्ये आले असताना वर्कशॉपच्या गेटवर एका व्यक्तीशी वाद झाला. त्यानंतर काही वेळात चार ते पाचजणांनी येऊन वर्कशॉपवर दगडफेक केली. दरम्यान हरीश्चंद्र देठे वर्कशॉपच्या गेटवर येताच त्यांच्या डोक्यात दगड घालुन हत्या करण्यात आली. 

त्यानंतर हल्लेखोर फरार आहेत. देठे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले..

दरम्यान चाकण औद्योगिक वसाहतीचा विस्तार झपाट्याने वाढत असताना एमआयडीसी च्या पाचव्या टप्याचे काम सुरु आहे. मात्र एकीकडे एमआयडीसीमध्ये कामगार, कंपनी मालकच जर सुरक्षित नसतील तर प्रशासनाचे वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

चाकण पोलीसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी दोन पथके तयार केली असुन आरोपींचा शोध सुरु आहे.