Mhada : घरे घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, दिवाळीच्या मुहूर्तावर 3 हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी

 Mhada Lottery 2021: तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी. 

Updated: Oct 19, 2021, 07:46 AM IST
Mhada : घरे घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, दिवाळीच्या मुहूर्तावर 3 हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी title=
संग्रहित छाया

पुणे : Pune Mhada Lottery 2021: तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी. दिवाळीच्या मुहूर्तावर 3 हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने (Mhada ) काढण्यात येत आहे. ( lottery of more than 3 thousand houses on the occasion of Diwali at Pune)

 Mhadaच्यावतीने ही घरांची लॉटरी काढण्यात येत असल्याने याची मोठी उत्सुकता आहे. एका वर्षांत घरांच्या लॉटरीची  हॅटट्रिक करण्यात आली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे.

ऐन कोरोना काळात जानेवारी 2020मध्ये म्हाडाच्यावतीने तब्बल 5 हजार 657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या लॉटरीला मोठी प्रतिसाद मिळाला. त्यानंतर म्हाडाने प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत म्हाडाने काढली होती. त्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडा आणखी तीन हजार पेक्षा जास्त घरांसाठी लॉटरी काढत आहे. 
 
सरकारने केलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करत सर्व मोठ्या बिल्डरांकडून 20 टक्क्यांतील घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देणे हा उद्देश ठेवला. त्यामुळे आता ही घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये 1500 घरे 20 टक्क्यातील आणि सर्व नामांकित तसेच मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.