कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध दिले, 40 वर्षीय महिलेवर दोनदा बलात्कार; पुण्यातील भयंकर घटना

Pune News Today: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन 40 वर्षीय महिलेवर बलात्कार करणार्‍या एकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 13, 2023, 12:35 PM IST
 कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध दिले, 40 वर्षीय महिलेवर दोनदा बलात्कार; पुण्यातील भयंकर घटना  title=
pune news 40 years old women from pune rape by her friend

सागर आव्हाड, झी मीडिया

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन 40 वर्षीय महिलेवर बलात्कार करणार्‍या एकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पीडित महिलेने मारहाणीची तक्रार दाखल केल्याच्या रागातून जातिवाचक शिव्या दिल्याने अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनुसार, सचिन यशवंत शिंदे (वय 43, रा. एनडीए रोड, शिवणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून ही घटना 8 मे 2023 आणि 20 जून 2023 या दोन दिवशी घडली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे एकमेकांना ओळखत होते. आरोपी सचिन शिंदे पीडित महिलेला वारजे येथे फिरायला घेऊन गेला होता. त्यानंतर तिला पिण्यासाठी कोल्ड्रिंक दिले. थोड्यावेळाने महिलेला चक्कर आल्यासारखे झाले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर आरोपी तिला घेऊन गेला तिथे त्याने तिच्या संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवले. इतकेच नव्हे तर त्याने पीडितेचे फोटोदेखील काढले. 

आरोपीने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा महिलेवर बलात्कार केला आहे. तसेच पीडित महिला या दुचाकी चालवायला शिकत असताना त्यांना शिवीगाळदेखील केली होती. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त भीमराव टेळे हे करत आहेत. 

बांगलादेशच्या तरुणीची विक्री

बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीची पुण्याच्या बुधवार पेठेत विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बांगलादेशातील या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेकायदेशीररित्या भारतात आणले होते. त्यानंतर बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलीची विक्री करून तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Pune Police) दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.