Pune Crime News: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना पुढे येत आहेत. दोन वर्षांच्या चिमुकलीपासून ते 60 वर्षांच्या वृद्ध स्त्रीवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळं एक असुरक्षितता निर्माण झाली आहे. आता गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बाप्पाची मिरवणूक, बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो लोक हजेरी लावतात. गर्दीच्या ठिकाणीही छेडछाड होण्याच्या घटना होतात. या घटनांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. (Pune News Today)
मुलींची छेड काढणाऱ्या आरोपींना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांनी वेगळीच शक्कल शोधून काढली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांनी एक उपाय शोधून काढला आहे. पुण्यातील चौकात महिला व तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंचे फोटो लावले जाणार आहेत. भर चौकात छेड काढणाऱ्यांचे फोटो लावण्यात येणार आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे.
गणेशोत्सवात देखावे पाहायला आणि गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणींची छेड काढून त्रास देणाऱ्या रोडरोमिओंची छायाचित्रे रस्तोरस्ती, भरचौकात फ्लेक्सवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. रोडरोमिओंना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी हा उपाय शोधला आहे. तसंच, रोडरोमिओंची परेडदेखील घेतली जाणार आहे.
पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या गाडीतळावर मध्यरात्री फायनस मॅनेजरची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. वासुदेव कुलकर्णी असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. घरासमोर शतपावली करताना अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून कुलकर्णी यांची हत्या केली आहे. नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुन्हा पुण्यात दुसरी खूनाची घटना घडली आहे. चाळीस वर्षीय वासुदेव कुलकर्णी हे पुण्यात फायनस कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. मात्र, त्यांची हत्या का करण्यात आली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये.