Pune News: काळोखी रात्र पण पठ्ठ्याला पिक्चर बघायचाय; PMPML चालकाचं धक्कादायक कृत्य; पाहा VIDEO

Pune Viral Video: पुणे महानगर परिवहन महामंडळाचा एक ड्रायव्हर मोबाईलवर सिनेमा पाहत बस चालवत होता. बसमधल्या प्रवाशांनी हा व्हिडिओ चित्रित केला असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Updated: Mar 20, 2023, 02:50 PM IST
Pune News: काळोखी रात्र पण पठ्ठ्याला पिक्चर बघायचाय; PMPML चालकाचं धक्कादायक कृत्य; पाहा VIDEO
PMPML Bus Driver Viral Video

PMPML Bus Driver Viral Video: पीएमपीएमएल (PMPML) म्हणजे पुण्याची लाईफलाईन. लाखो प्रवासी पीएमपीएमएलने (PMPML Bus) दररोज प्रवास करतात. पीएलपीएमएलच्या अप्रतिम सेवेमुळे पुणेकरांचा विश्वास आजही कायम आहे. अशातच आता पुण्यातील (Pune News) निगडी डेपोच्या पीएमपी ड्रायव्हरचा (Bus Driver) प्रताप समोर आलाय.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचा एक ड्रायव्हर मोबाईलवर सिनेमा पाहत बस चालवत होता. बसमधल्या प्रवाशांनी हा व्हिडिओ चित्रित केला असून सध्या हा व्हिडिओ व्हायरल झालाय. असा काही प्रकार घडला असल्यास त्याची चौकशी केली जाईल, असं आश्वासन पीएमपीएमएलच्या वाहतूक व्यवस्थापकांनी दिलंय.

आणखी वाचा - Pune Leopard News: पुण्यातील 'या' भागात बिबट्याचा धुमाकूळ; तब्बल दोन तासानंतर...; पाहा VIDEO

झालं असं की... 

पुण्यात एका पीएमपीएमएल चालक आपल्या मोबाईल फोनवर चित्रपट (watching cinema) पाहत गाडी चालवत होता. गाडीच्या स्टेयरिंगच्या मागे मोबाईल ठेवून हा पठ्ठ्या गाडी चालवत असल्याचं दिसत आहे. रात्रीच्या वेळी चालकाने हा स्टंट केलाय. कधी खाली तर कधी वर पाहत हा गाडी चालवताना दिसतोय.

पाहा VIDEO -

दरम्यान, ड्राईव्हरचा हा प्रताप पाहून प्रवाशांच्या जीव खालीवर झाला. त्यामुळे एका प्रवाशाने ड्राईव्हरचा व्हिडिओ (Trending Video) शूट केला आणि सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. त्याबरोबर चालकावर कारवाईची मागणी केली आहे.  पीएमपीएमएल या प्रकरणाची अधिकची माहिती घेत असून कारवाईचं आश्वासन दिलं आहे.