पिझ्झा वेळेत आला नाही, संतापलेल्या ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत केला हवेत गोळीबार

Pune News Today: पिझ्झा उशिरा दिल्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत फायरिंग केल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील वाघोली परिसरातील या घटनेने एकच गोंधळ उडाला आहे. 

सागर आव्हाड | Updated: Oct 25, 2023, 02:09 PM IST
पिझ्झा वेळेत आला नाही, संतापलेल्या ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत केला हवेत गोळीबार title=
pune news today customer beaten pizza delivery boy and firing in

Pune Crime News: पिझ्झा डिलिव्हर करण्यासाठी उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ घडला आहे. चेतन वसंत पडवळ असे डिलिव्हरी बॉयला मारण करत फायरिंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पिझ्झा उशीरा पोहोचला

रोहित राजकुमार हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतात. मंगळवारी रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला होता. पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याने उशिरा पोहोचवल्यानंतर दोघामध्ये याच कारणावरून वाद झाले. त्यानंतर पडवळ याने रोहितला मारण केली.

हवेत फायरिंग

रोहितला मारहाण झाल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी सेंटरमधील देवेंद्र राहुल आणि इतर त्याचे मित्र गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण करत त्याच्या कारमधून एक पिस्टल काढून हवेत फायरिंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात जीवितास धोका निर्माण होईल असा प्रकार केल्या प्रकरणी कलम 308, 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोयता गँगची दहशत कमी झाल्यानंतरही गुन्हेगारीचे प्रमाण काही अटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. 

पुण्यात उबर, स्विगी, झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचे आंदोलन

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन कंपनी सारख्या मोबाईल ॲप्लिकेशन वर काम करणारे कॅब, रिक्षाचालक व बाईक डिलिव्हरी तरुण आणि तरुणी बुधवारी बंद पाळणार आहेत. कंपन्यांकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपन्यांकडून अशा कामगारांना पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. ग्राहकाने केलेल्या तक्रारीची शहानिशा न करता परस्पर त्यांच्यावर कारवाई केली जाते, यामुळं या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राजस्थान सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही गिग कामगार नोंदणी व कल्याणकारी कायदा लागू करावा, ही मागणीसुद्धा करण्यात आली आहे.