पुणे : राज्यात कांद्याचे बाजारभाव एकदम गडगडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. दरम्यान, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यासमोर गळ्यात कांद्याच्या माळा घालत मोफत कांदा आणि दूध वाटप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
कांद्याचे बाजारभाव ढासळल्याने शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कांद्याचे बाजारभाव वाढावे यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर गळ्यात कांद्याच्या माळा घालत मोफत कांदा आणि दूध वाटप आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला कांदा उत्पादक शेतकय्रांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोफत कांदा आणि दुध मिळतंय म्हटल्या वरती शिरूर शहरातील नागरीकांची मोठी झुंबड उडाली.