close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

पुण्यातील धक्कादायक प्रकरण ; घरगुती वादला कंटाळून पतीनी गळफास घेतला...

Updated: Sep 11, 2019, 06:51 PM IST
पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

पुणे : शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पत्नीच्या सतत त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीवर आणि तिच्या भावंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनडीए रोड परिसरात ही घटना घडली आहे. अरुण सुरेश वाबळे (वय ३४, ) असं या मृतकाचं नाव आहे. या प्रकरणाबद्दल मृतकाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणावर पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

पत्नी अर्चना वाबळे उर्फ डावरे हिच्यासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपासून अर्चना आणि तिचे भावंड अरुणला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. तसेच अरुणला शिवीगाळ मारहाणही करत होते.

अरुण हा घरगुती वादला कंटाळला होता. त्यामुळे त्याने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चना आणि अरुणचा प्रेम विवाह झाला होता.

या प्रकरणात सुरुवातीला मृतकाची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. चौकशीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. अरुण पेटिंगचे काम करत होता आणि अर्चना ही खासगी शिकवणी घेत होती. त्यांना दोन मुले आहेत. सध्या या प्रकरणावर पोलिसांची चौकशी सुरू आहे.