कोण आहे डॉ. अदनान अली सरकार? आयसिसच्या इशाऱ्यावर तरूणांना घालत होता धर्माची भूल

पुण्यातून चार संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यात आता एका डॉक्टरची भर पडलीय. भूलतज्ज्ञ असलेला हा डॉक्टर आयसिसच्या इशाऱ्यावर तरूणांना धर्माची भूल घालत होता. काय होतं आयसिसचं महाराष्ट्र मॉडल पाहूयात

अरूण म्हेत्रे | Updated: Jul 28, 2023, 07:45 PM IST
कोण आहे डॉ. अदनान अली सरकार? आयसिसच्या इशाऱ्यावर तरूणांना घालत होता धर्माची भूल title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातून आयसिसच्या (ISIS) संशयित दहशतवाद्यांना (Terrorist) अटक केल्यानंतर याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येतायेत. याप्रकरणात पुण्यातून एका डॉक्टरला अटक करण्यात आलीय. अदनान अली सरकार (Dr Adnan Ali Sarkar) असं या डॉक्टरचं नाव आहे. अदनान अली हा भूलतज्ज्ञ म्हणून ओळखला जातो. मात्र धर्माची भूल देऊन त्यानं अनेक तरूणांना आयसिसच्या नादाला लावल्याचा आरोप होतोय. NIAनं त्याच्याकडून आयसिसशी निगडीत अनेक महत्त्वाची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केलीयेत. 

कोण आहे डॉ.अदनान अली सरकार?
अदनाननं 2001 मध्ये बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. 2006 मध्ये त्यानं भूलतज्ज्ञ म्हणून एम.डी. पदवी मिळवली..अॅनेस्थेशिया या विषयात रिसर्च पेपर लिहिले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून अदनान भूलतज्ज्ञ म्हणून काम करत होता. पुण्यात बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी याआधीच ATSनं चार जणांना अटक केलीय. तर आता NIAने ताबिश नासिर सिद्दीकी, जुबैर नूर महैम्मद शेख, शरजील शेख आणि जुल्फिकार अली अशी या आरोपींची नावं आहेत. त्यात आता भूलतज्ज्ञ डॉ. अदनान अली सरकारची भर पडलीय. 

आससिसचं महाराष्ट्र मॉडेल
सूत्रांच्या माहितीनुसार भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी स्लीपर सेल बनवण्यात आलं होतं. त्यांत अनेक युवकांची भरती करण्यात आली. विदेशात बसलेले आयसिसचे म्होरके त्यांना भारतात हिंसाचार भडकावण्याचं प्रशिक्षण देत होते. NIAने अटक केलेल्या या पाच आरोपींच्या टोळक्याला आयसिसचं महाराष्ट्र मॉडेल (Maharashtra Module) असं नाव देण्यात आलंय. तर बुधवारी ATSनं अटक केलेले दहशतवादी अल सफा संघटनेशी संबंधित असल्याचं समोर आलंय. चांदोली, कामशेत आणि अलिबाग इथं बेस कॅम्प उभारण्याचा त्यांचा प्लॅन होता. यात दोन तरूणींचाही समावेश असून यातील अलिफिया नावाची तरूणी दिल्लीतल्या एका विद्यापीठात शिक्षण घेत होती. दोन्ही तरुणींवर रिक्रूटमेंटची जबाबदारी होती. पुण्यात सातत्याने दहशतवादी कारवाया होत असल्याचं समोर आलं आहे. 

यूपी ATS आणि महाराष्ट्र ATSनं काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या जोगेश्वरीतून दोन आरोपींना अटक केली होती. हे दोघही पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा ISIसाठी काम करत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पुण्यात मोठी कारवाई झालीय. यातून पुण्यात मोठा घातपात घडवण्याचा आयसिसचा प्लॅन असल्याचं उघड होतंय. आता या आरोपींच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.