बिटकॉईनच्या नावाखाली पुण्यात महिलेला लाखोंचा गंडा

बिटकॉईन फसवणुकीचा पुण्यातील पहिला गुन्हा दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. 

Updated: Jan 18, 2018, 02:45 PM IST
बिटकॉईनच्या नावाखाली पुण्यात महिलेला लाखोंचा गंडा title=

पुणे : बिटकॉईन फसवणुकीचा पुण्यातील पहिला गुन्हा दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जास्तच चर्चेत आलेल्या बिटकॉईनच्या फसवणुकीच्या या घेटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

आकाश संचेतीला अटक

या फसवणुकी प्रकरणी निशा रायसोनी यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन आकाश संचेती या तरुणाला अटक करण्यात आली आहे. निशा रायसोनी यांनी संचेती याच्या सांगण्यावरून बिटकॉईनमध्ये तेरा लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. 

मोठा परतावा देण्याचं आमिष

या गुतंवणुकीवर मोठा परतावा देण्याचं आमिष संचेतीने दाखवलं होतं. मात्र, मुदत संपल्यावर संचेतीने पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली. पैसे परत मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर रायसोनी यांनी पोलीसात धाव घेतली. बिटकॉईन किंवा क्रीप्टो करन्सीच्या संदर्भात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.