close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भल्यामोठ्या अजगरानं भेकराला गिळलं

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली जकातवाडी इथे रिलायन्स टॉवर जवळ अजगारानं एका भेकराला गिळल्याची घटना घडली. सुमारे १० ते १५ किलो वजनाच्या भेकराला गिळल्यानं अजगर सुस्त होऊन तसाच पडला होता. या अजगराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. 

Updated: Jun 12, 2017, 07:44 AM IST
भल्यामोठ्या अजगरानं भेकराला गिळलं
प्रातिनिधिक फोटो

आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली जकातवाडी इथे रिलायन्स टॉवर जवळ अजगारानं एका भेकराला गिळल्याची घटना घडली. सुमारे १० ते १५ किलो वजनाच्या भेकराला गिळल्यानं अजगर सुस्त होऊन तसाच पडला होता. या अजगराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. 

या ठिकाणी निपचित पडलेल्या अजगराला स्थानिकांनी काठ्या ढोसून जोरात हलवलं. मात्र भेकर गिळल्यामुळे अजगराला हलता येत नव्हतं. त्यामुळे तिथून पळ काढण्याकरता, गिळलेलं भेकर अजगरानं ओकून टाकलं. 

त्यानंतर घटनास्थळी येऊन वन विभागानं मृत भेकर ताब्यात घेऊन पंचनाम्यानंतर ते जाळून टाकलं.