CCTV Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडीओ हृदयस्पर्शी असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होताना दिसत आहे. तुम्ही जर हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका. व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे उघडेच्या उघडे राहतील.
वडजाईचा तरुण हा सैन्य भरतीसाठी मुंब्रा (Mumbra CCTV Video) येथे आला होता. ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आले. या अपघाताची दृश्य समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. धुळे जिल्ह्यातील विजयी गावातील हा तरूण हृदयात देशप्रेम घेऊन सैन्य भरतीसाठी मुंब्रा येथे आला होता. प्रवास करण्यासाठी त्याने लोकलचा प्रवास निवडला.
रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर तरूणाची तब्येत खालावली. त्याला ओमीटींचा त्रास जाणवला. तात्काळ तो ओमीट करण्यासाठी रेल्वे मार्गाच्या ट्रॅक कडे धावला. त्याचवेळी कानावरती हात ठेवून ओमीट करत असतानाच काळाने घात केला. रेल्वे काही सेकंदात त्याठिकाणी आली. मात्र, तरूणाला रेल्वे आल्याचं जाणवलं देखील नाही.
वेगवान रेल्वेने तरूणाला धडक दिली. धडक इतकी घातक होती की, हा तरूण दहा फूट लांब जाऊन पडला. रेल्वेने (Railway Accident Video) त्याला धडक दिल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या संपुर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या तरुणाचे देश सेवेचे स्वप्न अपूर्ण राहिले, त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केला जात होती.
व्हिडीओ-