RajThackeray On Waheeda Rehman : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. हिंदी सिनेमात वहिदा रहमान यांचं योगदान फार मोठं आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करत वहिदा रहमान यांचं कौतुक केलंय. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? पाहुया...
वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. १९५६ ला राज खोसला ह्यांच्या 'सीआयडी' सिनेमातून करिअरला सुरुवात करत ते आजच्या तारखेपर्यंत सक्रिय असणाऱ्या वहिदाजी ह्या भारतीय सिनेमाचा जवळपास ६० वर्षांचा इतिहास आहे.
तुम्ही जे निवडता, त्यावर तुमची श्रद्धा असेल आणि कामाप्रती निष्ठा असेल तर तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून तुमचे नियम लोकांना स्वीकारायला लावू शकता हे वहिदाजींनी दाखवून दिलं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
पहिल्याच सिनेमात त्यांनी एका सीनसाठी मी वेडेवाकडे कपडे घालून शॉट देणार नाही असं ठासून सांगितलं. पहिलाच सिनेमा आहे, डायरेक्टर जे सांगेल ते ऐकलं पाहिजे इत्यादी गोष्टींना बाजूला सारत, मी जर या क्षेत्रांत टिकणार असेन तर माझ्या तत्वांशी मी तडजोड करणार हे नाही हे सांगणं सोपं नाही, पण ते वहिदाजींना जमलं. स्वतःचं मुस्लिम नाव आडनाव पण लपवण्याच्या भानगडीत त्या कधी पडल्या नाहीत आणि त्यांचं हिंदुस्थानीपण इतकं पक्क होतं की त्यांचा धर्म लोकांच्या मनाला शिवलं पण नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी वहिदा रहमान यांचं कौतुक केलंय.
वहिदा रहमान ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. १९५६ ला राज खोसला ह्यांच्या 'सीआयडी' सिनेमातून करिअरला सुरुवात करत ते आजच्या तारखेपर्यंत सक्रिय असणाऱ्या वहिदाजी ह्या भारतीय सिनेमाचा जवळपास ६० वर्षांचा इतिहास आहे.
तुम्ही जे निवडता,… pic.twitter.com/h1VsAKqcUE— Raj Thackeray (@RajThackeray) September 27, 2023
अशा व्यक्तीला हा सन्मान मिळणं यासारखी आनंदाची गोष्ट नाही, अर्थात वहिदाजीच नाहीत तर कुठल्याही कलाकाराला हे पुरस्कार थोडे आधी मिळायला काहीच हरकत नाही. पण असो. वहिदाजींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतफे मनःपूर्वक शुभेच्छा, असं म्हणत राज ठाकरे यांनी पोस्ट केली आहे.