MNS Raj Thackeray : राज ठाकरे चुकीचं बोलले? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपबद्दल चुकीचं...      

Updated: Apr 3, 2022, 10:46 AM IST
MNS Raj Thackeray : राज ठाकरे चुकीचं बोलले? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस title=

नांदेड : शिवाजीपार्क येथे काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Raj Thackeray )यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

निवडणूक होण्यापूर्वी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे नरेंद्र मोदी ( Narendra Modi ), अमित शहा (Amit Shah ) यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र आले. पण, निवडणूक झाल्या आणि मुख्यमंत्रीपदाची टूम निघाली. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद. एके सकाळी जुमलाच जुमला. लग्न कुणाचं आणि नवरी कुठली. मग आवाज आला, 'ये शादी नाही हो सकती.' सगळं शांत झालं. 

एक नंबरचा पक्ष भाजप, दुसरा शिवसेना, तिसरा राष्ट्रवादी. तिसऱ्या नंबरचा पक्ष पहिल्या नंबरला भुलवतोय. नंतर दोन नंबरच्या पक्षाबरोबर सलगी करतो, अशी टीका राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी केली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी राज ठाकरे यांचं समर्थन केलंय.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. भाजपाने सेनेशी युती केली. त्यामुळे सेनेच्याही चांगल्या जागा आल्या. दोघांना जनतेने बहुमत दिले. पण, त्या बहुमताचा अनादर करुन शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून तीन पक्षाची सत्ता कपटानी मिळवली. 

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून तेच सांगितले आहे. त्यांनी भाजपाबद्दल जे सांगितल ते सत्यच आहे. ते काही चुकीचे बोलले नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. फडणवीस आज नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.