अमित ठाकरेंवरील 'या' नव्या जबाबदारीमुळे राज ठाकरेही झाले आनंदित

जागतिक मराठी भाषा दिनी अमित राज ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद देण्याची घोषणा करण्यात आली. ही नवी जबाबदारी स्वीकारत नाहीत तोच अमित ठाकरे यांच्यावर आता आणखी एक मोठी जबाबदारी आलीय.

Updated: Mar 1, 2022, 01:52 PM IST
अमित ठाकरेंवरील 'या' नव्या जबाबदारीमुळे राज ठाकरेही झाले आनंदित  title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्याकडे नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत नवचैतन्य उसळले आहे. 

अमित ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी येऊन पडलीय. पण ही जबाबदारी राजकीय नाही तर घरगुती आहे. अमित ठाकरे यांच्याकडे 'एक गोड बातमी' आहे.

राज ठाकरे यांनी आपलं जुनं ‘कृष्णकुंज’ निवासस्थान सोडलं आणि नव्या ‘शिवतीर्थ’ येथे सहकुटुंब राहण्यासाठी आलेत. या नव्या वास्तूत आता छोटी छोटी पावले उमटणार आहेत. छोट्या कृष्णलीलांनी हे घर आता आनंदानं उजळून निघणार आहे. 

राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे हे 'आजी- आजोबा' तर सूनबाई मिताली आणि पुत्र अमित ठाकरे 'आई-बाबा' होणार आहेत. या गोड बातमीमुळे ठाकरे परिवारात उत्साहाचं वातावरण आहे.

अमित आणि मिताली यांची कॉलेजमध्ये असल्यापासूनची प्यारवाली लव्ह स्टोरी आहे. मिताली ही रुईयाइट्स आहे तर अमित पोद्दार कॉलेजमध्ये शिकत होता. त्यावेळी या दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबद्ध झाले.

प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची मिताली मुलगी आहे. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं असून ‘द रॉक’ हा कपड्यांचा ब्रँड त्यांनी लाँच केला.