नागपूर: आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र आली नाही तर शिवसेनेत फुट पडेल अशी शक्यता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलीय. शिवसेनेत फुट पडून सेनेतील आमदार -खासदार फुटण्याची शक्यता आहे असं मत आठवलेंनी माडलं. सेनेने भाजपसोबत यावे असा आमचा प्रयत्न आहे. पंतप्रधान हे उद्धव ठाकरे यांना बोलावून त्यांची नाराजी दूर करण्याच्या शक्यता असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.