पतीसोबत बोलत असताना बळजबरी झुडपात नेले, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर बलात्कार

Mumbai Crime News: टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. महिलेला अडवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 14, 2023, 05:19 PM IST
पतीसोबत बोलत असताना बळजबरी झुडपात नेले, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर बलात्कार title=
rape of woman returning home walking on track near titwala station

Mumbai Crime News: मुंबईतही आता महिला सुरक्षित नसल्याचं चित्र समोर आले आहे. टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येतंय. 

सोमवारी महिला प्रवासी लोकलमधून उतरुन घरी जात होती त्याचवेळी आरोपी विशाल चव्हाण याने तिला बळजबरी रुळांशेजारी असलेल्या झुडपात खेचून नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून विशाल चव्हाण या आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

पीडित महिला शहाड येथे एका खासगी कंपनीत काम करते. टिटवाळा रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर ही पीडित महिला शेजारीच असलेल्या रुळावरुन घराकडे जात होती. पीडिच महिला तिच्या पतीशी फोनवर बोलत होती. याचदरम्यान एक आरोपी तिचा पाठलाग करत होता. एका क्षणाला त्याने पीडित महिलेचा हात पकडून तिला रुळा शेजारी असलेल्या झुडपात नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली. याच दरम्यान पीडितेचा फोन सुरूच होता. 

महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिला या प्रकाराबद्दल कुठे बोलल्यास जिवे ठार मारु अशी धमकी दिली. मात्र, घाबरलेल्या महिलेने तिच्या पतीला याविषयी माहिती दिली तसंच, नंतर जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विशालला अटक केली असून त्याच्याविरोधात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशाल पडघा येतील एका खासगी कंपनीत काम करतो. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, ऐन दिवाळीत असा काही प्रकार घडल्याने परिसरातही भितीचे वातावरण पसरले आहे.