मनमाड : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांवर आयकर विभागाने धाड़सत्र सुरु केल्यानंतर व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडलेत.. शेतकऱ्यांचा कांदा सडत असल्यामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान होतंय... त्यामुळे लिलाव सुरु करण्याची मागणी करत आज संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला.
कांद्याचे वाढते भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनानं निर्यात शुल्क वाढवून व्यापा-यांच्या साठेबाजीविरोधात धाडसत्र सुरु केलंय. दरम्यान तहसीलदारांनी व्यापाऱ्यांची बैठक घेवून सोमवारपासून लिलाव पुर्ववत सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
एक तास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे वाहतुक ठप्प झाली होती. सोमवारी कांदा लिलाव सुरु न झाल्यास व्यापाऱ्यांच्या गाड्या बाहेर जावू न देण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिल्याने शेतकरी आता हिंसक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.