मुंबई : Ration card News : आज प्रत्येक ठिकाणी रेशन कार्डची गरज लागते. अनेकवेळा रेशन कार्डमध्ये (Ration card) तुमचे नाव नसेल तर काही कामांचा खोळंबा होतो. त्यावेळी असा प्रश्न पडतो की, नवीन सदस्याचे नाव किंवा आपले नाव जोडायचे असेल तर काय करावे? तुम्ही हे काम सहज करू शकता. तुम्ही नवीन सदस्याचे नाव ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही प्रकारे जोडू शकता. तशी सुविधा उपलब्ध आहे.
तुम्हाला जर जातप्रमाणपत्र काढायचे असेल तर तुमचे रेशन कार्डवर (Ration card) नावाची नोंदणी करजेची आहे. तसेच सरकारकडून मोफत धान्य देण्यात येत आहे. त्यासाठी तुमचे रेशन कार्डमध्ये नाव असणे गरजेचे आहे. जर नाव नसेल तर तुम्हाला धान्य मिळत नाही. कोरोना महामारीमध्ये सरकारने रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन व्यतिरिक्त अनेक विशेष सुविधा दिल्या आहेत.
रेशन कार्ड (Ration card) हे अॅड्रेस प्रूफ (Address Proof) आणि ओळख पुरावा (Identity Proof) म्हणून याचा वापर होतो. तसेच हे कार्ड बँक संबंधित कामासाठी किंवा एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी देखील वापर शकता. मतदार ओळखपत्र बनवण्याव्यतिरिक्त, इतर आवश्यक कागदपत्रे बनवण्यासाठी रेशन कार्डचा वापर नेहमीच होत शकतो.
तुमच्या मुलाचे नाव जोडायचे असेल, तर तुम्हाला मुलाच्या जन्माचे प्रमाणपत्र सोबत घरच्या प्रमुखांचे रेशन कार्ड (फोटोकॉपी आणि मूळ दोन्ही) आणि त्याच्या दोन्ही पालकांचे आधार कार्ड आवश्यक असेल. त्याचवेळी, जर लग्नानंतर पत्नीचे नाव जोडायचे असेल तर त्या महिलेचे आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र, पतीचे रेशन कार्ड (फोटोकॉपी आणि ओरिजिनल दोन्ही) आणि पहिल्या पालकांच्या घराच्या रेशन कार्डमधून नाव वगळल्याचा दाखला आवश्यक असायला पाहिजे.
1. तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठ्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
2. जर तुम्ही यूपीचे असाल (https://fcs.up.gov.in/FoodPortal.aspx) तर तुम्हाला या लिंकवर जावे लागेल.
3. आता तुम्हाला एक लॉगिन आयडी बनवावा लागेल, जर तुमच्याकडे आधीपासूनच आयडी असेल तर त्याद्वारे लॉग इन करा.
4. होम पेजवर, नवीन सदस्य जोडण्याचा पर्याय दिसेल.
5. त्यावर क्लिक करून, आता एक नवीन फॉर्म तुमच्या समोर येईल.
6. येथे आपल्या कुटुंबातील नवीन सदस्याची सर्व माहिती योग्यरित्या भरा.
7. फॉर्म सोबत, तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी देखील अपलोड करावी लागेल.
8. फॉर्म सबमिट केल्यानंतर नोंदणी क्रमांक दिला जाईल.
9. याद्वारे तुम्ही या पोर्टलवर तुमचा फॉर्म ट्रॅक करू शकता.
10. अधिकारी फॉर्म आणि कागदपत्रे तपासतील. जर सर्व काही ठीक झाले तर तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल आणि पोस्टद्वारे तुमच्या घरी रेशन कार्ड मिळेल.
1. नवीन नाव नोंदविण्यासाठी जवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जावे लागेल.
2. वरील सर्व नमूद केलेली कागदपत्रे आपल्यासोबत ठेवा.
3. अन्न पुरवठा केंद्रात तुम्हाला नवीन सदस्याचे नाव जोडून फॉर्म घ्यावा लागेल.
4. फॉर्ममध्ये सर्व सविस्तर माहिती भरा.
5. आता कागदपत्रांसह माहिती भरलेला अर्ज अन्न पुरवठा केंद्रात जमा कला
6. नवा सदस्य नाव नोंदणी अर्ज दिल्यानंतर ठरावीक शुल्क देखील जमा करावे लागेल.
7. अर्ज दिल्यानंतर, अधिकारी तुम्हाला एक पोच पावती देतील, ती तुम्ही जपून ठेवा.
8. या पावतीद्वारे आपण ऑनलाइन अर्जाची स्थिती तपासू शकता.
9. अन्न पुरवठा अधिकारी तुमचा फॉर्म तपासतील आणि कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला तुमचे रेशन किमान दोन आठवड्यांत घरी येईल.