पुढील 4 ते 5 दिवस महत्वाचे, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

Rain in Maharastra​ : पावसासंदर्भात अतिशय महत्वाची बातमी. 

Updated: Sep 11, 2021, 07:27 AM IST
पुढील 4 ते 5 दिवस महत्वाचे, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता title=
Pic Courtesy : PTI

मुंबई : Rain in Maharastra : पावसासंदर्भात अतिशय महत्वाची बातमी. ऐन गणपती उत्सवात मुसळधार पाऊस (Rain) कोसळणार आहे. तसा इशार हवामान विभागाने दिला आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सतर्कतेचा इशारा दिला आहे.

येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे हे वारे पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Low pressure area in Bay of Bengal likely to cause rains in Maharashtra: IMD)

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे (Maharashtra heavy rainfall warning ) भारतीय हवामान विभागाने सांगितले. तसेच मुंबईत मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक ठिकाणी अधूनमधून तीव्र पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण भागात पुढील पाच दिवसांत वेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.  पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी, सर्व किनारपट्टी असलेल्या जिल्ह्यांसाठी सतर्कत राहावे लागणार आहे.