शिर्डी : शिर्डीच्या साईभक्तांच्या संख्येनं नवा विक्रम प्रस्तापीत केलाय. भारतातील सर्व मंदिरांच्या तुलनेत शिर्डीतील साई मंदिरात सर्वाधिक भाविक दर्शनाला येत असल्याची नोंद लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये करण्यात आलीय. रोज सरासरी २५ हजार भाविक साईंचं दर्शन घेतात. ही संख्या कधीकधी ६५ हजारांच्या घरात जाते. मात्र गुरुपौर्णिमा आणि दिवाळीच्या कालावधीत भाविकांची संख्या लाखोंवर जाते. वर्षाचा आढावा घेतल्यास ही संख्या कोटींच्या घरात जाते.
लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'नुसार, शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या इतर कोणत्याही मंदिराहून कित्येक पटींनी जास्त आहे.
साई बाबा संस्थानाचे ट्रस्टी डॉ. राजेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, बाबांच्या ख्यातीमुळे भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. फक्त देशातलेच नाही तर विदेशातूनही लोक बाबांच्या दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे कोणत्याही एका धर्माचे किंवा जातीचे नाही तर सर्वधर्मीय भक्तांमध्ये शिर्डीचे साईबाबा प्रसिद्ध आहेत.