बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदासाठी मागवले जातायेत अर्ज; आत्ताच फॉर्म भरा

Bank of Maharashtra Recruitment : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्रेडिट ऑफिसर (Credit Officer) पदाच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सौरभ तळेकर | Updated: Oct 25, 2023, 07:01 PM IST
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदासाठी मागवले जातायेत अर्ज; आत्ताच फॉर्म भरा title=
Bank of Maharashtra, Recruitment, Credit Officer

BOM Recruitment 2023: तुम्हालाही बँकेत (Bank of Maharashtra) काम करण्याची इच्छा असेल तर एक सुवर्णसंधी चालून आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्रेडिट ऑफिसर (Credit Officer) पदाच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या या मोहिमेच्या माध्यमातून संस्थेतील एकूण 100 पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्रच्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवार bankofmaharashtra.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार आहेत. क्रेडिट ऑफिसर स्केल 2 च्या पदासाठी 50 पदं भरती जाणार आहेत. तर क्रेडिट ऑफिसर स्केल 3 च्या पदासाठी 50 पदांची भरती केली जाईल. 

इच्छुक उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेत किमान कटऑफमध्ये येणाऱ्या उमेदवारांना मुलाखती बोलवलं जाईल. ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीमध्ये फिट बसणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा कराल?

अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम bankofmaharashtra.in  या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथं करिअर नावाचा टॅब दिसेल, ज्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला रिक्रूटमेंट प्रोसेसवर क्लिक करावं लागेल. तिथं गेल्यावर अॅप्लाय लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही उजव्या बाजूच्या रखाण्यात लॉगिन करू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता 

अर्ज करण्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवी असणं आवश्यक आहे. तुम्ही इतर अटी नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. 

क्रेडिट ऑफिसर स्केल II साठी 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA तसेच 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे.

क्रेडिट ऑफिसर स्केल III साठी 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA तसेच 5 वर्षे अनुभव असावा, अशी अट आहे.