रेमडिसिव्हर देता का रेमडिसिव्हर? कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा सरकारविरोधात संताप

नाशिकमध्ये अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना काही दिवसांपासून रेमडिसिव्हर औषध उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे आज रुग्णांचे नातलग आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले.

Updated: Apr 10, 2021, 11:52 AM IST
रेमडिसिव्हर देता का रेमडिसिव्हर? कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा सरकारविरोधात संताप title=

नाशिक :  राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. कित्येक जिल्ह्यांमध्ये लशीनंतर ऑक्सिजन, बेडचा तुटवडा भासू लागला आहे. परंतु त्यासोबतच औषधांचा तुटवडा देखील भासू लागला आहे. नाशिकमध्ये अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना काही दिवसांपासून रेमडिसिव्हर औषध उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे आज रुग्णांचे नातलग आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले.

 
 नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोनावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेमडिसिव्हर इंजेक्शनसाठी वणवण भटकणाऱ्या रुग्णांच्या नातलगांनी आज आंदोलन केले.
 
 रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे, नाशिकमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली.  
 
 तासंतास रांगेत उभे राहून देखील इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त नागरिकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.