मुंबई : कर्जत आणि मंकी हिल या घाट क्षेत्रात रुळांच्या दुरस्तीचे काम मध्य रेल्वेनं हाती घेतलं आहे. १५ ऑक्टोबरपासून १० दिवस सुरू राहणाऱ्या कामांमुळे मुंबई ते पुणे, पंढरपूर, भुसावळ, नांदेडसह अन्य गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार आहे.
१६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत पुणे ते मुंबई ते पुणे प्रगती एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. याआधीही याच घाट क्षेत्रात कामे घेण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा आरक्षण करुन प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी घाट क्षेत्रातील कामं १० दिवसांच्या आत संपवण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती मुख्य जनसपंर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रगती एक्स्प्रेस- १६ ऑक्टोबर-२० ऑक्टोबर
पंढरपूर सुपरफास्ट पॅसेंजर- १७-१९ ऑक्टोबर
पंढरपूर सीएसएमटी सुपरफास्ट पॅसेंजर- १८-२० ऑक्टोबर
मुंबई ते बिजापूर फास्ट पॅसेंजर- १५, १६, २० ऑक्टोबर
बिजापूर ते मुंबई फास्ट पॅसेंजर- १६, १७ आणि २१ ऑक्टोबर
१५ ते २० ऑक्टोबर- कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावेल आणि पुण्यातून सुटेल
१५ ते २० ऑक्टोबर- हुबळी ते एलटीटी एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावेल आणि पुण्यातून सुटेल
१६ ते २० ऑक्टोबर- हैद्राबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावेल आणि पुण्यातून सुटेल