राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला दे धक्का. 

Updated: Oct 15, 2019, 12:54 PM IST
राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश title=

पुणे : वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापू पठारे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. ऐन निवडणुकीत पठारे यांनी राष्ट्रवादीला दे धक्का दिला आहे. पठारे हे महापालिकेचे माजी नगरसेवकही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते शरद पवारांसोबत होते. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता तेव्हापासून पक्षानं आपल्याकडे दुर्लक्ष केल्याची त्यांची तक्रार आहे. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर पठारे यांनी सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. वडगाव शेरी चे विद्यमान आमदार तसेच भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्यासह मुंबईला गेले होते. तिथेच हा पक्षप्रवेश पार पडला. बापू पठारे भाजपमध्ये आल्यानं वडगाव शेरी मधील भाजपची ताकद आणखीनच वाढली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस साठी हा मोठा धक्का आहे.