नदी स्वच्छ करण्यात महिलांचा पुढाकार

जवळपास पाच हजारांवर महिलांनी मोर्णा स्वच्छता अभियानात आपला सहभाग नोंदवला. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 11, 2018, 12:58 PM IST
नदी स्वच्छ करण्यात महिलांचा पुढाकार

अकोला : मोर्णा नदी स्वच्छतेसाठी अकोल्यात मातृशक्ती मोर्णाकाठी एकवटली होती. निमित्त होतं ते दर शनिवारी अकोल्यातील मोर्णा नदी स्वच्छता मिशनचं. जवळपास पाच हजारांवर महिलांनी मोर्णा स्वच्छता अभियानात आपला सहभाग नोंदवला. 

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

13 जानेवारीपासून दर शनिवारी मोर्णा स्वच्छता अभियान राबविलं जातंय. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेत जनतेला या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. 

'मन की बात' कार्यक्रमातून या मोहिमेचं कौतूक

नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या 'मन की बात' कार्यक्रमातून या मोहिमेचं कौतूक केलं होतं. या स्वच्छता अभियानासाठी आता अकोलेकरच नव्हे तर जिल्हाभरातून नागरिक सहभागी होताहेत.