महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाची सुरूवात इंदापुरात

देशातील महत्वाकांशी नदी जोड प्रकल्पाची सुरुवात पुण्यातील इंदापूर तालुक्यात झाली आहे. नीरा आणी भीमा या दोन नद्या एकमेकांना जोडण्याचे काम सध्या जोरात चालू आहे.

Updated: Oct 22, 2017, 10:59 PM IST
महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाची सुरूवात इंदापुरात title=

जावेद मुलाणी, झी मीडिया, इंदापूर : देशातील महत्वाकांशी नदी जोड प्रकल्पाची सुरुवात पुण्यातील इंदापूर तालुक्यात झाली आहे. नीरा आणी भीमा या दोन नद्या एकमेकांना जोडण्याचे काम सध्या जोरात चालू आहे. या प्रकल्पामुळे पाणी एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात आणले जात आहे. पाहूयात कसा आहे हा प्रकल्प.

इंदापूर तालुक्यातील उद्धट येथून नीरा नदीतील पाणी 24 किलोमीटर बोगद्यातून उजनीच्या पानलोट क्षेत्रात सोडले जाणार आहे. आणी हे काम सध्या  वेगात चालू आहे, त्यासाठी  जमिनीखाली शंभर फुटाहून अधीक खोलीवर एका बोगद्याचं काम वेगात सुरु आहे.. 
 
या प्रकल्पातून नीरा नदीचे पाणी भिमा नदीत म्हणजेच उजनीच्या पानलोट क्षेत्रात चोवीस किलोमीटरच्या बोगद्यातून आणले जाणार आहे. हेच पाणी पुढे करमाळा तालुक्यातील जेऊर येथून सिना - कोळेगाव या धरणात सत्तावीस किलोमीटरच्या बोगद्यातून सोडले जाणार आहे. आणी उजनीच्या पूर्व बाजूच्या एकवीस किलोमीटरच्या बोगद्यातून सिना नदीत हे पाणी सोडले जाणार आहे. 

या पाण्यामुळे मराठवाड्यातील  उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा वाशी आणि बीड जिल्हातील  आष्टी या तालुक्यातील   34 हजार 000 हेकटर  शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 

इतकंच नाही तर अनेक गांवाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. सध्या नीरा नदीच्या तावशी येथून उजनी धरणाच्या डाळज पर्यंत बोगद्याद्वारे नदी जोड प्रकल्पाचे काम इंदापूर तालुक्यातील अकोले ,काझड, डाळज  या  गावाच्या हद्दीत  तीन शॉफ्ट मध्ये सुरु आहे. 

सुमारे तीन किलोमीटर अंतरावर शॉफ्ट खोदून बोगद्याचं खोदकाम सुरु आहे.. या प्रस्तावित कामासाठी तीनशे कामगार काम करीत आहेत. २०१२ मध्ये या कामाला सुरुवात करण्यात आली होती, मात्र सरकारकडून निधी मिळत नसल्याने मध्यंतरी दोन वर्षे काम बंद होते. तावशी ते डाळज पर्यंत सोमा आणि मोहिते या कंपनीच्या वतीने काम सुरु आहे.

पावसाचे अतिरिक्त वाया जाणारे पाणी, या नदीजोड प्रकल्पामुळे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात वळवले गेले आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतीसाठीही उपयोग होणार आहे.