Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना नागपूर-शिर्डी प्रवासात 900 रुपयांचा टोल

Nagpur Super Communication Expressway : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील (Maharashtra Samruddhi Mahamarg) नागपूर ते शिर्डी ( Nagpur-Shirdi journey) अशा 520 किमीच्या मार्गावरील टोल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

Updated: Dec 2, 2022, 08:48 AM IST
Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना नागपूर-शिर्डी प्रवासात 900 रुपयांचा टोल title=
संग्रहित छाया

Nagpur-Mumbai Super Communication Expressway : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील (Maharashtra Samruddhi Mahamarg) नागपूर ते शिर्डी ( Nagpur-Shirdi journey) अशा 520 किमीच्या मार्गावरील टोल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. नागपूर-शिर्डी प्रवासात 900 रुपयांचा टोल (Samruddhi Mahamarg toll) आकारला जाणार आहे. या मार्गात 19 टोल नाके कार्यान्वित करण्यात आले असून हे टोलनाके 19 एक्झिट पॉईंटवर आहेत. ( Maharashtra News) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गातील पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. हा मार्ग सेवेत दाखल झाल्यास नागपूर ते शिर्डी अंतर केवळ पाच तासात पार करता येणार आहे. मात्र या प्रवासासाठी 900 रुपये टोल भरावा लागणार आहे.

मुंबई आणि नागपूर या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक चांगला आणि दोन शहरांतील अंतर कमी करण्यासाठी मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाकडे पाहिले जात आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जाणारा 10 जिल्ह्यांतील 392 गावांमधून धावेल आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल.

समृद्धी महामार्ग सुरु करण्याची तारीख जाहीर झाली आहे. टप्प्याटप्प्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी दरम्यान सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.  यापूर्वी एक्स्प्रेस वेचे उद्घाटन मे 2022 मध्ये होणार होते. परंतु या मार्गावरील वन्यजीव ओव्हरपासच्या एका भागाचा अपघात झाला होता. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

कोरोना काळात देशव्यापी लॉकडाऊनमुळे मुंबई ते नागपूर द्रुतगती महामार्गाच्या बांधकामावर परिणाम झाला. त्यामुळे, समृद्धी महामार्ग पूर्णत्वाची तारीख पुढे गेली. आता शिर्डी ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आणि समृद्धी महामार्ग 2023 च्या मध्यापर्यंत कार्यान्वित होईल, असे सांगितले जात आहे.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x