दोन वर्षांचा झाला सुरज! वाजत गाजत मालकाने साजरा केला रेड्याचा वाढदिवस

 सुरजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या मालकाने वाजत-गाजत त्याची मिरवणूक काढली. यावेळी सुरजच्या वाढदिवसाचे होर्डिंगडी लावण्यात आले होते. मालकाचे हे प्राणीप्रेम पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले

Updated: Jan 6, 2023, 04:16 PM IST
दोन वर्षांचा झाला सुरज! वाजत गाजत मालकाने साजरा केला रेड्याचा वाढदिवस title=

Sambhaji Nagar News : सध्याच्या जगात माणसे आपल्या प्रिय व्यक्तींपेक्षा त्यांच्या प्राण्यांना जास्त जीव लावताना दिसतात. काही प्राणीप्रेमींनी त्यांच्या आवडत्या प्राण्यांचे वाढदिवसही साजरा केल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. असाच प्रकार महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये नुकताच पाहायला मिळाला. संभाजीनगरमध्ये एका रेड्याच्या (buffalo birthday) मालकाने त्याचा दुसरा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला आहे. सुरज असे या रेड्याचे नाव आहे. सुरजच्या मालकाने त्याची वाजत-गाजत काढली मिरवणूक काढली आणि त्यानंतर केक कपात त्याचा वाढदिवस साजरा केला आहे.

पशु पालनाला चालना मिळावी म्हणून सुरजच्या मालकाने त्याचा दुसरा वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाची सध्या संपूर्ण संभाजी नगरात चर्चा सुरु झाली आहे. चेलीपुरा भागात राहणारे शंकरलाल पहाडिया यांचा सुरज नावाचा रेडा दोन वर्षाचा झाला. पहाडिये यांनी  रेड्याच्या वाढदिवसानिमित्त ठिक ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. 

यावेळी डोलीबाजा लावत नाचत गाजत शहरभर सुरजची मिरवणूक काढण्यात आली होती. शहराचे आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपती येथे मिरवणुकीची सांगता करत केक कापून सुरज नावाच्या रेड्याचं वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. सुरजच्या वाढदिवसासाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी जेवणाची मेजवानी देखील ठेवण्यात आली होती. शहरातील नागरिक पशु पालनाकडे कानाडोळा करत आहेत. मात्र हिच आपली संस्कृती आहे. ती नागरिकांनी जोपासावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे रेड्याचे मालक पहाडिया पहाडिये यांनी सांगितले.

पाळीव कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी

दरम्यान,उत्तर प्रदेशमध्ये एका प्राणी प्रेमी व्यक्तीने आपल्या लाडक्या पाळीव कुत्र्याच्या वाढदिवासानिमित्त मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत होता.
हा व्हिडिओ बांदा जिल्ह्यातील टिंडवाडा गावातील होता. बृजभूषण तिवारी नावाच्या व्यक्तीने त्याच्या कुत्र्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा केला. ब्रिज भूषण यांनी त्यांच्या कुत्र्याचा वाढदिवस आपल्या मुलांप्रमाणेच केला आहे. या वाढदिवसाला अनेकांनी हजेरी लावली होती. 

कुत्र्याच्या वाढदिवशी बोकडाचा बळी

एकीकडे प्राणी प्रेमाच्या नावाखाली मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जात असताना काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला होता. झारखंडमधील धनबाद येथे लोयाबाद येथे एका कुत्र्याचा अगदी सेलिब्रिटीप्रमाणे वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मात्र या कुत्र्याच्या सुरक्षेसाठी  काली मातेच्या मंदिरात बोकडाचा बळी दिला होता. एक जीव वाचवण्यासाठी दुसरा जीव दिल्याच्या प्रकारानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते.