सांगली : तुम्ही सांगलीत राहत असाल आणि जर तुमच्याकडे तुमचा पाळीव कुत्रा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण सांगली महापालिका क्षेत्रातील पाळीव कुत्र्यांना आता ५ हजार रुपये वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे.
२० एप्रिलला होणाऱ्या महानगरपालिकेच्या महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. भटक्या आणि पाळीव कुत्र्याचे नागरिकांवर हल्ले वाढलेले आहेत. त्यामुळे भटके आणि पाळीव कुत्री यांचा फरक व्हावा, त्याच बरोबर या कुत्र्यांची नोंद आणि मालकांची जबाबदारी निश्चित व्हावी या साठी हा निर्णय घेतला जाणार आहे.
शहरात सुमारे २०-२५ हजाराहून अधिक संख्येने पाळीव कुत्री आहेत. जर या प्रस्तावावर निर्णय झाला तर यामुळे किमान पालिकेलाही १२ ते २५ लाख रुपये उत्पन्न मिळू शकणार आहे.